SIP Date: शेअर बाजारात चढ-उतार सुरू झाले की अनेक SIP गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न येतो — “SIP ची तारीख बदलली तर जास्त रिटर्न मिळतील का?” काही लोक महिन्याच्या सुरुवातीला SIP करणे चांगले मानतात, तर काही जण शेअर मार्केट पडायची वाट पाहतात.
पण खरंच SIP Date बदलल्याने मोठा फायदा होतो का? 30 वर्षांच्या डेटावर आधारित एका स्टडीतून याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अभ्यासामुळे SIP मध्ये टायमिंगपेक्षा शिस्त अधिक महत्त्वाची असल्याचे स्पष्ट झाले आहे.
SIP मध्ये योग्य तारीख निवडणे किती महत्त्वाचे आहे?
WhiteOak Capital Mutual Fund ने ऑगस्ट 1996 ते एप्रिल 2026 या जवळपास 30 वर्षांच्या कालावधीतील BSE Sensex TRI च्या SIP रिटर्नचा अभ्यास केला. या अभ्यासात महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना SIP केल्यास रिटर्नमध्ये किती फरक पडतो हे पाहण्यात आले. अभ्यासानुसार, प्रत्येक महिन्यात “सर्वात योग्य दिवशी” SIP करणाऱ्या गुंतवणूकदाराला 13.80% XIRR मिळाला. तर “सर्वात चुकीच्या दिवशी” SIP करणाऱ्या गुंतवणूकदाराला 13.32% XIRR मिळाला. म्हणजेच परफेक्ट टायमिंग आणि बेकार टायमिंग यामध्ये फक्त 0.48% एवढाच फरक दिसून आला.

वेगवेगळ्या SIP Dates वर किती रिटर्न मिळाला?
Whiteoak Capital Mutual Fund च्या अभ्यासात महिन्याच्या विविध तारखांवरील SIP रिटर्नदेखील पाहण्यात आले. विशेष म्हणजे जवळपास सर्व तारखांवर रिटर्न सारखाच राहिला. महिन्याच्या 1 तारखेला SIP करणाऱ्यांना 13.59% रिटर्न मिळाला. 10 तारखेला SIP करणाऱ्यांना 13.55% रिटर्न मिळाला. 20 तारखेला केलेल्या SIP वर 13.58% रिटर्न मिळाला, तर 28 तारखेला SIP करणाऱ्यांना 13.61% रिटर्न मिळाला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, SIP साठी कोणती “जादुई तारीख” नसते जी इतर तारखांपेक्षा खूप जास्त फायदा देते. म्हणून Best SIP Date शोधणे बंद करा. आणि जितक शक्य तितक्या लवकर SIP चालू करा..
SIP मध्ये टायमिंगपेक्षा कन्सिस्टन्सी महत्त्वाची
अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केट खाली आल्यावर SIP थांबवतात किंवा योग्य वेळेची वाट पाहतात. पण या डेटामधून दिसून आले की, नियमित आणि शिस्तबद्ध SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांनी जवळपास परफेक्ट टायमिंग इतकेच रिटर्न मिळवले. SIP चे खरे सामर्थ्य हे मार्केट टायमिंगमध्ये नसून लाँग टर्ममध्ये टिकून राहण्यात असते. शेअर मार्केट वर-खाली होत राहतो, पण लाँग टर्ममध्ये शेअर मार्केट नेहमीच वर जातो.
SIP मध्ये तारीख बदलावी का?
जर तुमचा पगार महिन्याच्या सुरुवातीला येत असेल तर सुरुवातीला SIP करा. जर महिन्याच्या मधोमध पगार येत असेल तर त्या काळात SIP ठेवू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे SIP ची तारीख बदलून रिटर्नमध्ये फार मोठा फरक पडत नाही. त्यामुळे वारंवार SIP Date बदलण्यापेक्षा नियमित गुंतवणूक सुरू ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते. मध्ये SIP सुरू ठेवणे का महत्त्वाचे?
मार्केट पडल्यावर SIP चालू ठेवणे का महत्वाचे आहे?
जेव्हा शेअर मार्केट खाली येतो तेव्हा अनेक गुंतवणूकदार घाबरतात. पण अशा काळात SIP सुरू ठेवणे फायदेशीर ठरू शकते कारण कमी किमतीत अधिक म्युच्युअल फंड युनिट्स मिळतात. यालाच रूपी कॉस्ट AvaeragingRupee Cost Averaging म्हणतात. दीर्घकालीन गुंतवणुकीत Market चे छोटे चढ-उतार फार महत्त्वाचे राहत नाहीत. त्यामुळे SIP मध्ये संयम आणि सातत्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
निष्कर्ष
30 वर्षांच्या डेटाने एक महत्त्वाचा धडा दिला आहे — SIP मध्ये “योग्य तारीख” शोधण्यापेक्षा नियमित गुंतवणूक करणे जास्त महत्त्वाचे आहे. परफेक्ट टायमिंग आणि बेकार टायमिंगमधील फरक अत्यंत कमी असल्याने SIP च्या तारीखेवर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. जर तुम्ही लाँग टर्मसाठी SIP करत असाल, तर मार्केट टायमिंगच्या मागे न लागता शिस्त आणि संयमवर वर भर द्या. कारण SIP मध्ये मोठा फायदा हा वेळ आणि सातत्यामुळेच मिळतो.