जर तुम्ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी असा म्युच्युअल फंड शोधत असाल जो Large Cap, Mid Cap आणि Small Cap कंपन्यांमध्ये लवचिक पद्धतीने गुंतवणूक करतो, तर SBI Flexi Cap Fund तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या पोस्टमध्ये आपण SBI Flexi Cap Fund ची संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. मग तुम्हाला समजेल या फंडमध्ये इन्वेस्ट करांव की नाही? चला तर सुरुवात करू!
Flexi Cap Fund म्हणजे काय?
Flexi Cap Fund हा इक्विटी म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे जो Large Cap, Mid Cap आणि Small Cap कंपन्यांमध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय गुंतवणूक करू शकतो. बाजारातील संधी आणि परिस्थिती पाहून फंड मॅनेजर पोर्टफोलिओमध्ये बदल करत असतो. त्यामुळे या प्रकारच्या फंडामध्ये विविध मार्केट कॅप कंपन्यांचा समावेश असल्याने दीर्घकालीन काळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते.
SBI Flexi Cap Fund बद्दल माहिती
SBI Flexi Cap Fund ची सुरुवात 29 September 2005 रोजी करण्यात आली होती. त्यामुळे हा भारतातील जुना आणि अनुभवी Flexi Cap Funds पैकी एक मानला जातो. SBI Mutual Fund कडून ऑफर केला जाणारा हा एक Open Ended Equity Scheme आहे, जो Large Cap, Mid Cap आणि Small Cap कंपन्यांमध्ये लवचिक पद्धतीने गुंतवणूक करतो. दीर्घकालीन Wealth Creation साठी अनेक गुंतवणूकदार या लोकप्रिय Flexi Cap Mutual Fund ची निवड करतात.
SBI Flexi Cap Fund NAV Today काय आहे?
NAV म्हणजे Net Asset Value. NAV म्हणजे फंडाच्या एका युनिटची किंमत. NAV दररोज बाजारातील हालचालीनुसार बदलत असतो. 15-May-2026 रोजी या फंडाची NAV ₹105.1028 इतकी आहे. ताजी NAV जाणून घेण्यासाठी AMC ची अधिकृत वेबसाइट किंवा Mutual Fund Apps चा वापर करू शकता.
SBI Flexi Cap Fund Returns काय आहेत?
SBI Flexi Cap Fund ने मागील 3 वर्षांमध्ये या फंडाने सुमारे 9.99% परतावा दिला आहे. 5 वर्षांचा Return 10.55% राहिला आहे, तर 10 वर्षांचा Return 12.13% इतका आहे. फंड सुरू झाल्यापासून म्हणजेच Since Inception Return सुमारे 12.07% राहिला आहे. मात्र Mutual Fund Returns हे बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतात, त्यामुळे भविष्यातील परतावे निश्चित नसतात. SIP द्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास Compounding चा फायदा मिळू शकतो.
SBI Flexi Cap Fund चा Fund Manager कोण आहे?
Anup Upadhyay हे SBI Flexi Cap Fund चे Fund Manager आहेत आणि त्यांनी 01-Dec-2024 पासून या फंडाची जबाबदारी सांभाळली आहे. Anup Upadhyay यांनी B.Tech, PGDM आणि CFA हे शिक्षण पूर्ण केले आहे. SBI Mutual Fund मध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी Tata Consultancy Services TCS मध्ये काम केले आहे. त्यांचा मार्केट आणि इक्विटी रिसर्चमधील अनुभव फंड व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.
SBI Flexi Cap Fund Exit Load काय आहे?
जर गुंतवणूकदारांनी ठराविक कालावधीपूर्वी आपली गुंतवणूक काढली तर Exit Load लागू होतो. SBI Flexi Cap Fund मध्ये 30 दिवसांच्या आत Redemption केल्यास 0.1% Exit Load आकारला जातो. त्यामुळे अल्पकालीन गुंतवणुकीपेक्षा दीर्घकालीन गुंतवणूक अधिक फायदेशीर मानली जाते.
SBI Flexi Cap Fund Expense Ratio काय आहे?
Expense Ratio म्हणजे फंड व्यवस्थापनासाठी AMC कडून आकारले जाणारे वार्षिक शुल्क होय. SBI Flexi Cap Fund चा Expense Ratio 30-Apr-2026 नुसार 2.29% इतका आहे. जास्त Expense Ratio असल्यास दीर्घकालीन परताव्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
SBI Flexi Cap Fund AUM किती आहे?
AUM म्हणजे Assets Under Management. याचा अर्थ या फंडामध्ये गुंतवलेली एकूण रक्कम. 30-Apr-2026 नुसार SBI Flexi Cap Fund चे AUM ₹22,403 कोटी इतकी आहे. जास्त AUM असलेले फंड सामान्यतः गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय मानले जातात.
SBI Flexi Cap Fund Top Holdings काय आहेत?
या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ICICI Bank, SBI, Axis Bank, HDFC Bank आणि Larsen & Toubro सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ICICI Bank मध्ये सुमारे 5.52% Allocation आहे, तर SBI मध्ये 5.02% आणि Axis Bank मध्ये 4.42% गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय HDFC Bank आणि Larsen & Toubro मध्येही महत्त्वाची गुंतवणूक आहे. Top Holdings वेळोवेळी बदलू शकतात.
गुगलवर आपल्या ब्लॉगला Preferred Source म्हणून Add करा!
SBI Flexi Cap Fund Minimum SIP Amount किती आहे?
या फंडामध्ये गुंतवणूकदार कमी रकमेपासून SIP सुरू करू शकतात. SBI Flexi Cap Fund मध्ये Minimum SIP Amount ₹500 इतकी आहे. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांनाही नियमित गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
SBI Flexi Cap Fund Minimum Lumpsum Investment किती आहे?
जर तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करायची असेल, तर SBI Flexi Cap Fund मध्ये Minimum Lumpsum Investment ₹1,000 इतकी आहे. त्यामुळे नव्या गुंतवणूकदारांसाठीही हा फंड सहज उपलब्ध होतो.
SBI Flexi Cap Fund मध्ये इन्वेस्ट कसे कराल?
तुम्ही SBI Flexi Cap Fund मध्ये AMC च्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा मोबाईल App द्वारे गुंतवणूक करू शकता. तसेच Demat Account प्लॅटफॉर्म जसे Groww आणि Zerodha यांच्या मदतीनेही या फंडात इन्वेस्ट करता येते. याशिवाय म्युच्युअल फंड सल्लागार किंवा बँकेत जाऊनही तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीपूर्वी KYC पूर्ण करणे आवश्यक असते. SIP किंवा Lumpsum या दोन्ही पद्धतींनी या फंडामध्ये सहज गुंतवणूक करता येते.
निष्कर्ष
SBI Flexi Cap Fund हा जुना आणि लोकप्रिय Flexi Cap Fund असला तरी मागील काही वर्षांतील Returns इतर काही Flexi Cap Funds च्या तुलनेत कमी दिसून आले आहेत. तसेच या फंडाचा Expense Ratio देखील तुलनेने जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी इतर Flexi Cap Funds सोबत तुलना करणे महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही Flexi Cap Category मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर इतर उच्च परफॉर्मन्स असलेल्या Flexi Cap Funds चादेखील विचार करू शकता.