जिओ ब्लॅकरॉक म्यूचुअल फंड सीईओंच्या दृष्टिकोनातून – उत्पादन, एआय आणि डिजिटलायझेशन भारताला कुठे घेऊन जातील? | Jio BlackRock Mutual Fund News in Marathi

अलीकडे मी Jio BlackRock चे CEO Sid Swaminathan यांचा एक पॉडकास्ट ऐकला. हा संवाद गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महितीपूर्वक होता. त्याच पॉडकास्टमधील काही महत्वाचे मुद्दे आज आपण जाणून घेऊ — पुढील पाच वर्षांत कोणते sectors चांगले काम करू शकतात आणि गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे.

Sector पेक्षा महत्त्वाचे Macro Trends

जेव्हा Swaminathan यांना विचारले गेले की कोणते sectors पुढील काही वर्षांत outperform करतील, तेव्हा त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन मांडला — “It’s not about sectors, it’s about macro trends.” हे वाक्य मला खूप विचार करायला लावणारे वाटले. कारण हेच प्रत्यक्षात गुंतवणुकीच्या दिशेने योग्य मार्ग दाखवते.

Macro Trends म्हणजे काय? (सोप्या भाषेत)

Macro trends म्हणजे मोठे, दीर्घकालीन आर्थिक किंवा सामाजिक बदल जे अनेक उद्योगांवर एकाच वेळी परिणाम करतात.
एका sector किंवा company कडे पाहण्याऐवजी, गुंतवणूकदारांनी अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या मोठ्या शक्तींवर लक्ष केंद्रित करावे.

  • Long-term drivers: Macro trends वर्षानुवर्षे चालतात आणि अर्थव्यवस्थेचा आकार घडवतात.
  • Across industries: जसे digitalization हा एक ट्रेंड, जो technology, finance आणि manufacturing तिन्ही क्षेत्रांना फायदेशीर ठरतो.
  • Economic direction: वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेत हे ट्रेंड्स पुढील संधी कुठे निर्माण होणार आहेत हे दाखवतात.

India ची Growth Story – Manufacturing, AI आणि Digitalization

Swaminathan यांच्या मते भारताच्या प्रगतीच्या कहाणीचे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत — Manufacturing, AI (Artificial Intelligence), आणि Digitalization.

  • Manufacturing: भारत आपली उत्पादन क्षमता वाढवत आहे आणि जागतिक सप्लाय चेनचा महत्त्वाचा भाग बनत आहे.
  • AI (Artificial Intelligence): हे तंत्रज्ञान उत्पादनक्षमता वाढवत आहे.
  • Digitalization: व्यवसाय कसे चालतात आणि ग्राहक कसे सेवा वापरतात यात झपाट्याने बदल घडवत आहे.

हे तीन ट्रेंड्स मिळून भारताच्या पुढील विकासाच्या टप्प्याचे पायाभूत घटक आहेत.

इतक्या NFOs मध्ये योग्य निवड कशी करावी?

आजकाल बाजारात दर काही दिवसांनी नवीन NFOs (New Fund Offers) येताना दिसतात. Swaminathan यांचा सल्ला अत्यंत साधा होता: “तुमचे उद्दिष्ट काय आहे – short, medium किंवा long term?”

  • जर तुम्हाला बाजाराच्या वाढीवर विश्वास असेल, तर index funds हा सोपा आणि कमी खर्चिक पर्याय आहे.
  • आणि जर तुम्ही बाजाराला beat करण्याचा विचार करत असाल, तर active funds योग्य ठरतात.

म्हणजेच, तुमची fund निवड तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी जुळली पाहिजे.

Jio BlackRock Expense Ratio – सर्वात कमी?

Jio BlackRock चा आणखी एक उल्लेखनीय मुद्दा म्हणजे त्यांचा expense ratio — जो mutual fund उद्योगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे, विशेषतः Flexi Cap Fund साठी. Swaminathan यांनी स्पष्ट सांगितले की, expense ratio महत्त्वाचा असतो कारण तो दीर्घकाळात तुमच्या परताव्यावर परिणाम करतो. कमी खर्च म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचा जास्त परतावा तुमच्याजवळ राहतो.

तसेच त्यांनी हेही सांगितले की, Jio BlackRock इतरांशी स्पर्धा करत नाही, तर भारतातील ₹75 trillion mutual fund industry मध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे.

वाचा | म्युच्युअल फंडमध्ये शुल्क कमी होणार! सेबीच्या नवीन प्रस्तावाबद्दल जाणून घ्या | Mutual Fund Fee Reforms by SEBI

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अभ्यासक आहेत. त्यांनी साडेचार वर्षे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत (Saraswat Bank) कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहकांच्या वित्तीय सेवांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. सध्या ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) मध्ये 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते सर्वसामान्य तसेच HNI गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात मदत करतात.
    ते NISM आणि SEBI सारख्या सरकारी संस्थांकडून मान्यताप्राप्त (Certified) असून, त्यांनी खालील महत्त्वाच्या परीक्षा पास केल्या आहेत:

    NISM Series V-A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM Series V-B: म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन

    NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM: म्युच्युअल फंड ऑपरेशन्स मॉड्यूल

    SEBI: इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन

    आपल्या याच अनुभवाच्या जोरावर साजन भुवड हे मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक बचतीबद्दल (Personal Finance) अगदी सोप्या आणि विश्वासाने समजेल अशा भाषेत लिहितात. सामान्य माणसाला पैशांचे योग्य निर्णय घेता यावेत, त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी आणि भविष्यात चांगली संपत्ती तयार व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top