Best Tax Saving Mutual Funds: टॅक्स वाचवायचा आहे? मग हे आहेत 3 बेस्ट टॅक्स सेविंग फंड्स?

Best Tax Saving Mutual Funds: आपण सगळे रोज मेहनत करून कमाई करतो, पण Tax Planning हेही तितकंच महत्त्वाचं आहे. टॅक्स बचतीसाठी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत, त्यात सर्वात लोकप्रिय आणि फायदेशीर पर्याय म्हणजे Tax Saving Mutual Funds (ELSS). हे फंड्स तुम्हाला Tax बचत करण्यासोबतच Long-term Wealth Creation मध्येही मदत करतात.

Tax Saving Mutual Funds (ELSS) म्हणजे काय?

ELSS (Equity Linked Savings Scheme) हे असे Mutual Funds आहेत जे त्यांच्या एकूण संपत्तीपैकी किमान 80% भाग Equity आणि संबंधित साधनांमध्ये गुंतवतात. या फंडचा मुख्य उद्देश आहे — Long-term Capital Appreciation म्हणजेच दीर्घकालीन वाढ.

या फंड्समध्ये 3 वर्षांचा Lock-in Period असतो. त्यामुळे हे फंड नियमित गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानले जातात.
हे Best Tax Saving Mutual Funds गुंतवणूकदारांना Equity च्या माध्यमातून चांगले परतावे देतात आणि Section 80C अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंत कर सवलत देतात.

ELSS Mutual Funds मध्ये गुंतवणूक का करावी?

ELSS Mutual Funds हे असे साधन आहे जे एकाच वेळी दोन फायदे देतात – Tax बचत आणि Long-term Wealth Creation या फंड्समधून मिळणारे परतावे हे बाजाराशी जोडलेले (Market-linked) असल्याने, ते पारंपरिक साधनांपेक्षा (PPF, FD इत्यादी) जास्त असतात. जर तुमचं गुंतवणुकीचं लक्ष्य 3-5 वर्षांचं असेल, तर ELSS हा उत्तम पर्याय आहे.

Top 3 Best ELSS Funds (2025)

चला पाहूया सध्या (2025 मध्ये) कोणते Best Tax Saving Mutual Funds 3 वर्षांच्या परफॉर्मन्सच्या आधारावर सर्वोत्तम ठरले आहेत.

SBI ELSS Tax Saver Fund

हा फंड 1993 मध्ये सुरु झाला असून आज 32 वर्षांचा अनुभव आहे. याचं AUM ₹299 billion पेक्षा जास्त आहे. हा फंड Value Conscious दृष्टिकोन ठेवतो आणि Largecap, Midcap, Smallcap कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. हा फंड Buy & Hold Strategy वापरतो आणि दीर्घकाळात सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.

  • 3-Year CAGR: 25.56%
  • 5-Year CAGR: 27.05%
  • Top Sectors: Banking, Auto & IT

HDFC ELSS Tax Saver Fund

1996 मध्ये सुरु झालेला HDFC ELSS Tax Saver Fund हा जुना आणि विश्वासार्ह फंड आहे. त्याचा AUM ₹165 billion आहे. हा फंड Growth + Value Investing चा संतुलित दृष्टिकोन ठेवतो. जर तुम्हाला स्थिरता आणि वाढ दोन्ही हवे असतील तर हा Mutual Fund उत्तम पर्याय आहे.

  • 3-Year CAGR: 23.21%
  • 5-Year CAGR: 25.16%
  • Top Sectors: Banking, Auto, Healthcare

DSP ELSS Tax Saver Fund

2007 मध्ये सुरु झालेला DSP ELSS Tax Saver Fund हा फंड Bottom-up Stock Picking पद्धती वापरतो. त्याचा AUM ₹165 billion असून, पोर्टफोलिओ अत्यंत विविधीकरण केलेला आहे. हा फंड स्थिर आणि दीर्घकालीन वाढीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे.

  • 3-Year CAGR: 20.53%
  • 5-Year CAGR: 24.82%
  • Top Sectors: Banking, Healthcare, IT

वाचा | Mutual Fund Investment: SIP एक मासिक बिल ज्याने तुम्हाला पैसे परत मिळतात — कसं ते जाणून घ्या!

Top Tax Saving Mutual Funds Performance (as on 29 Sept 2025)

फंड नाव1-Year (%)3-Year CAGR (%)5-Year CAGR (%)SDSharpeSortino
SBI ELSS Tax Saver Fund16.8225.5627.0512.520.410.95
HDFC ELSS Tax Saver Fund17.0623.2125.1611.390.400.93
DSP ELSS Tax Saver Fund17.6420.5324.8212.810.320.71
Category Average12.9317.9522.3512.950.280.56
Nifty 500 – TRI10.9116.1321.3912.770.230.47

(नोंद: Mutual Fund Investment हे बाजारातील जोखमींवर अवलंबून असतात. कृपया सर्व दस्तऐवज नीट वाचा आणि आपल्या Financial Advisor कडून सल्ला घ्या.)

ELSS Mutual Funds कोणासाठी योग्य आहेत?

जर तुम्ही थोडीशी Risk घेणारे गुंतवणूकदार असाल आणि तुमचं गुंतवणुकीचं लक्ष्य 3-5 वर्षांचं असेल, तर ELSS Funds तुमच्यासाठी आदर्श आहेत. हे फंड्स तुम्हाला Tax बचत आणि Wealth Creation दोन्ही साध्य करण्यात मदत करतात.

निष्कर्ष

Tax Saving Mutual Funds (ELSS) हे अशा गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम आहेत जे Mutual Fund Investment च्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू इच्छितात आणि कर सवलतही मिळवू इच्छितात. SBI, HDFC आणि DSP सारखे फंड्स त्यांच्या स्थिर परफॉर्मन्समुळे 2025 मध्ये Best Tax Saving Mutual Funds म्हणून ओळखले जात आहेत.

वाचा | Best Mid Cap Funds: मागील 3 वर्षात 25% पेक्षा जास्त रिटर्न देणारे टॉप फंड – तुम्ही इन्वेस्ट करता का यामध्ये?

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अभ्यासक आहेत. त्यांनी साडेचार वर्षे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत (Saraswat Bank) कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहकांच्या वित्तीय सेवांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. सध्या ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) मध्ये 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते सर्वसामान्य तसेच HNI गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात मदत करतात.
    ते NISM आणि SEBI सारख्या सरकारी संस्थांकडून मान्यताप्राप्त (Certified) असून, त्यांनी खालील महत्त्वाच्या परीक्षा पास केल्या आहेत:

    NISM Series V-A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM Series V-B: म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन

    NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM: म्युच्युअल फंड ऑपरेशन्स मॉड्यूल

    SEBI: इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन

    आपल्या याच अनुभवाच्या जोरावर साजन भुवड हे मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक बचतीबद्दल (Personal Finance) अगदी सोप्या आणि विश्वासाने समजेल अशा भाषेत लिहितात. सामान्य माणसाला पैशांचे योग्य निर्णय घेता यावेत, त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी आणि भविष्यात चांगली संपत्ती तयार व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top