Nippon India Growth Mid Cap Fund: 30 वर्षे केली पूर्ण – गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश?

Nippon India Growth Mid Cap Fund: भारतामधील सर्वात विश्वासार्ह Mutual Fund Investment पर्यायांपैकी एक असलेला Nippon India Growth Mid Cap Fund याने 8 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या प्रवासाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. 8 ऑक्टोबर 1995 रोजी सुरू झालेल्या या फंडने 22.27% वार्षिक परतावा (Return Since Inception) दिला आहे — म्हणजेच दीर्घकालीन गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

1995 मध्ये जागरूकता नव्हती — पण तुम्ही भाग्यवान आहात

1995 मध्ये “Mutual Funds Sahi Hai” अशी मोहीम नव्हती. ना सोशल मीडिया, ना मोबाइल अॅप्स.
गुंतवणुकीबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. पण आज तुमच्या हातात सर्व माहिती, अॅप्स आणि प्लॅटफॉर्म्स आहेत. जर तुम्ही तुमच्या 20s किंवा 30s मध्ये कमवत असाल, तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. आणि तरीही आपण चांगली संपत्ती बनवू नाही शकलो तर चूक आपलीच असेल.

Nippon India Growth Mid Cap Fund चे महत्वाचे तपशील

  • Fund House: Nippon India Mutual Fund
  • Assets: ₹38,386 Cr (As on 31-Aug-2025)
  • Launch Date: 08-Oct-1995
  • Expense Ratio: 1.55% (As on 30-Sep-2025)
  • Benchmark: NIFTY Midcap 150 TRI
  • Riskometer: Very High
  • Exit Load: 1% (30 दिवसांच्या आत रिडेम्प्शनसाठी)

किमान गुंतवणूक फक्त ₹100 पासून सुरू करता येते, त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांसाठी देखील हा फंड योग्य आहे.

₹1 लाख झाले ₹4.16 कोटी — 30 वर्षांच्या संयमाचे फळ

जर तुम्ही 8 ऑक्टोबर 1995 रोजी Nippon India Growth Mid Cap Fund मध्ये ₹1 लाख गुंतवले असते, तर आज त्या गुंतवणुकीची किंमत ₹4.16 कोटी झाली असती. हीच आहे दीर्घकालीन Mutual Fund Investment ची ताकद.
कंपाउंडिंग आणि सातत्य यामुळे तुमचे पैसे वेळेनुसार प्रचंड वाढू शकतात.

SIP Investment ची ताकद: ₹2,500 झाले ₹6.25 कोटी

दरमहा फक्त ₹2,500 ची SIP investment केली असती आणि ती 30 वर्षे चालू ठेवली असती, तर आज तिची किंमत जवळपास ₹6.25 कोटी झाली असती! यातून हे स्पष्ट होते की थोड्या-थोड्या गुंतवणुकीने, पण नियमितपणे केल्यास मोठी संपत्ती निर्माण करता येते. गुपित फक्त एकच — SIP थांबवू नका आणि बाजारात राहा. म्हणून मी नेहमी म्हणतो रक्कम छोटी असेल चालेल पण एक SIP अशी करा जी तुम्ही थांबवणार नाही.

गुपित फक्त एकच — संयम आणि सातत्य

मोठ्या रकमेची गरज नाही. जेवढे शक्य आहे तेवढे नियमित SIP investment करा आणि ती थांबवू नका. Mutual Fund Investment ही “Market Timing” बद्दल नाही — ती “Time in the Market” बद्दल आहे. पुढील 20–30 वर्षांमध्ये पुन्हा एकदा असाच ग्रोथ स्टोरी घडू शकतो — आणि या वेळेस तुम्ही त्या कहाणीचा भाग होऊ शकता.

निष्कर्ष

Nippon India Growth Mid Cap Fund च्या 30 वर्षांच्या प्रवासाने हे सिद्ध केले आहे की Mutual Fund Investment द्वारे दीर्घकालीन संपत्ती निर्माण शक्य आहे. गुंतवणूक लवकर सुरू करा, सातत्य ठेवा आणि संयम ठेवा — कारण कंपाउंडिंगचं जादू तुमचं भविष्य बदलू शकतं.

वाचा | Best Tax Saving Mutual Funds: टॅक्स वाचवायचा आहे? मग हे आहेत 3 बेस्ट टॅक्स सेविंग फंड्स?

Author

Leave a Comment