सध्या जगभरात Geopolitical Tensions वाढताना दिसत आहेत. युद्ध, दहशतवादी हल्ले, सीमावाद आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष यामुळे Share Market मध्ये अस्थिरता वाढते आणि अनेक Mutual Fund Investors घाबरतात. Market मध्ये अचानक घसरण झाली की अनेकांना वाटू लागतं की आता गुंतवणूक काढून FD किंवा सुरक्षित पर्यायांकडे वळावं. पण इतिहासाकडे शांतपणे पाहिलं, तर एक वेगळीच गोष्ट समोर येते. इतिहास स्पष्टपणे दाखवतो की अशा मोठ्या Geopolitical Events मुळे Market मध्ये तात्पुरती घसरण झाली असली, तरी Long Term मध्ये बाजाराने पुन्हा Recovery केली आहे आणि चांगला परतावाही दिला आहे.
Share Market Crash आणि युद्धाचा इतिहास काय सांगतो?
गेल्या अनेक वर्षांत जगाने अनेक मोठे संघर्ष पाहिले आहेत. Kargil War, 9/11 Terror Attacks, Indian Parliament Attack, US Invasion of Iraq, Mumbai 26/11 Attacks, Uri Attack, Pulwama Attack, Russia–Ukraine War आणि Israel–Hamas Conflict यांसारख्या घटनांदरम्यान Share Market मध्ये Panic Selling झाली होती. त्या काळात अनेक गुंतवणूकदार घाबरले होते आणि Market मध्ये मोठी Volatility दिसली होती. परंतु या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान होती की Market मधील घसरण कायमस्वरूपी नव्हती.
Geopolitical Events दरम्यान Market Drawdown किती झाला?
NJ Mutual Fund केलेल्या स्टडीनुसार, या संघर्षांच्या काळात Share Market मध्ये सरासरी 7.48% ची घसरण झाली होती. म्हणजेच Geopolitical Tensions मुळे Market वर परिणाम झाला, पण तो तात्पुरता होता. Market मधील ही Volatility पाहून अनेक Mutual Fund Investors घाबरतात. पण Market चा इतिहास सांगतो की घसरणीनंतर Recovery देखील तितकीच महत्त्वाची असते.
Long Term Mutual Fund Investment का महत्त्वाची आहे?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनांनंतर पुढील काही वर्षांत Market ने पुन्हा मजबूत Recovery केली. इतिहास सांगतो की युद्ध किंवा संघर्ष सुरू झाल्यानंतर पुढील 5 वर्षांत Market ने सरासरी 26.02% CAGR परतावा दिला. तर पुढील 10 वर्षांत हा सरासरी CAGR जवळपास 19.66% राहिला. याचा अर्थ असा की ज्यांनी भीतीपोटी Mutual Funds विकले नाहीत आणि संयम ठेवला, त्यांना Long Term मध्ये चांगला फायदा झाला.
Mutual Fund SIP बंद करणं योग्य आहे का?
इथे Mutual Fund Investors साठी एक खूप मोठा धडा आहे. बहुतेक वेळा नुकसान Market मुळे होत नाही, तर आपल्या भावनांमुळे होतं. Market खाली गेला की लोक SIP बंद करतात, Units विकतात किंवा गुंतवणूक थांबवतात. पण अशाच काळात Long Term Investors शांत राहतात आणि वेळेला काम करू देतात. खरं तर Market मधील Volatility ही Mutual Funds ची कमतरता नाही, तर Wealth Creation चा एक भाग आहे. कारण Market पडल्यावरच SIP द्वारे अधिक Units कमी किमतीत खरेदी होतात. आणि जेव्हा Market पुन्हा वाढतो, तेव्हा त्याच गुंतवणुकीचा फायदा मोठ्या प्रमाणात दिसतो.
Warren Buffett चा Mutual Fund Investors साठी महत्त्वाचा सल्ला
Warren Buffett यांचं एक प्रसिद्ध वाक्य इथे खूप महत्त्वाचं ठरतं की “Be fearful when others are greedy and greedy when others are fearful.” म्हणजेच इतर लोक घाबरलेले असताना शांत राहणं आणि योग्य दृष्टी ठेवणं हे यशस्वी गुंतवणुकीचं महत्त्वाचं रहस्य आहे.
Share Market News पेक्षा Financial Goals महत्त्वाचे
दररोजच्या News Headlines, युद्धाच्या बातम्या किंवा Share Market Crash मुळे आपले Long Term Financial Goals बदलू नयेत. कारण इतिहास सांगतो की मजबूत अर्थव्यवस्था आणि चांगल्या कंपन्या वेळेनुसार पुन्हा उभ्या राहतात. म्हणूनच Mutual Fund Investors साठी सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम, शिस्त आणि वेळ.