Mutual Fund: आपण सगळेच आपल्या गुंतवणुकीत चांगला रिटर्न मिळवू इच्छितो. पण एक साध सत्य अस आहे की: रिटर्न आपल्या हातात नाही. जी गोष्ट पूर्णपणे आपल्या हातात आहे ती म्हणजे गुंतवणूक प्रक्रिया.
चला उदाहरणाने समजून घेऊया.
रिटर्न – आपल्या नियंत्रणात नाही
समजा तुम्ही आज चांगला म्युच्युअल फंड निवडून SIP सुरु केली. तो फंड भविष्यात चांगला रिटर्न देईल की नाही? हे कुणालाही ठाऊक नाही. मार्केटच्या चढ-उतार, जागतिक घटना, आणि आर्थिक परिस्थिती यावर रिटर्न अवलंबून असतो आणि हे आपल्या हातात नाही.
गुंतवणूक प्रक्रिया – आपल्या नियंत्रणात आहे
रिटर्न आपण नियंत्रित करू शकत नाही, पण गुंतवणूक प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण आहे:
- चांगला म्युच्युअल फंड निवडणे.
- लांब मुदतीसाठी फंडमध्ये राहणे.
- बाजार परिस्थिती पाहून SIP नियमित सुरू ठेवणे.
- लहान-लहान चढ-उतारात घाबरणे टाळणे.
SIP – एक प्रक्रिया, एक वेळचा निर्णय नाही
SIP म्हणजे एकदा गुंतवून विसरून जाणे नाही. ही दीर्घकालीन शिस्त आहे.
उदाहरण: जर तुम्ही ₹2500 प्रति महिना SIP सुरु केला आणि प्रत्येक वर्षी 10% वाढ केली, तर 25 वर्षांमध्ये, तुम्हाला मिळेल ₹1,25,91,418 (14% रिटर्न धरून). 30 वर्षांमध्ये (फक्त 5 वर्षे जास्त), तुम्हाला मिळेल ₹2,69,92,792.
हाच आहे कंपाउंडिंगचा चमत्कार. जितक्या जास्त वेळ गुंतवणूक केली, तितके तुमचे पैसे दुप्पट होतात.
लक्षात ठेवा: येथे 14% धरले आहे, पण Flexi Cap किंवा Mid Cap फंड्स यामध्ये प्रत्यक्षात अधिक रिटर्न मिळू शकतो.
प्रक्रिया महत्त्वाची का आहे?
जर तुमची गुंतवणूक प्रक्रिया शिस्तबद्ध असेल, तर दीर्घकालीन चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते. फक्त रिटर्नच्या मागे धावल्यास तुम्ही सतत फंड बदलता राहाल आणि कंपाउंडिंगचा खरा फायदा गमावाल.
अंतिम विचार
ज्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता त्यावर लक्ष ठेवा – तुमची गुंतवणूक प्रक्रिया. SIP नियमित सुरू ठेवा, प्रत्येक वर्षी थोडी वाढ करा, आणि कंपाउंडिंगसाठी वेळ द्या. असे केल्यास, चांगला रिटर्न आपोआप मिळेल.
वाचा: 3 Best Mid Cap Funds: 5 वर्षांत 275% ते 365% परतावा? जाणून घ्या फंड्स!