Financial Planning: साधं टर्म इन्शुरन्स की इन्शुरन्स + इन्व्हेस्टमेंट प्लान? योग्य पर्याय कोणता?

Financial Planning: आज आपल्या पेजचा फॉलोवर प्रकाशसोबत मी म्यूचुअल फंड पोर्टफोलिओ प्लॅनिंगवर चर्चा केली. बोलता बोलता समजलं की तो टर्म इन्शुरन्स घेण्याचा विचार करत आहे. त्याने सांगितलं की त्याला TATA AIA चा एक टर्म प्लान सुचवला आहे.

👉 कव्हर: ₹1 कोटी
👉 प्रीमियम: ₹53,000 प्रति वर्ष

पहिल्यांदा ऐकताना हे टर्म इन्शुरन्ससारखं वाटलं, पण बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं की हा खरं तर इन्शुरन्स + इन्व्हेस्टमेंट प्लान आहे. मी प्रकाशला सांगितलं की – “तुं साधा आणि सरळ टर्म इन्शुरन्स प्लान घे. तोच फायदेशीर आहे.”

आता असं का? हे समजून घेऊया.

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स म्हणजे ठराविक कालावधीसाठी घेतलेलं इन्शुरन्स. उदा. प्रकाश 30 वर्षांचा आहे आणि तो 70 वयापर्यंत ₹1 कोटीचं टर्म इन्शुरन्स घेऊ इच्छितो. म्हणजे एकूण 40 वर्षे संरक्षण. या काळात प्रकाशला काही झालं तर त्याच्या कुटुंबाला ₹1 कोटीची रक्कम मिळेल. पण जर काहीच घडलं नाही तर त्याला काहीही परत मिळणार नाही. यालाच Pure Term Insurance म्हणतात.

साधं टर्म इन्शुरन्स Vs इन्शुरन्स + इन्व्हेस्टमेंट

प्रकाशला सुचवलेल्या प्लॅनमध्ये:

  • ₹1 कोटीचं कव्हर
  • प्रीमियम ₹53,000/वर्ष
  • Disability Cover ₹50 लाख
  • काही पैसे इन्व्हेस्टमेंटमध्ये जातील

पण साधा टर्म प्लान घेतला असता:

  • तेच ₹1 कोटीचं कव्हर
  • Accidental Disability सोबत
  • प्रीमियम फक्त ₹15,000 /वर्ष

म्हणजेच, दरवर्षी ₹37,000 ची बचत!

बचत झालेली रक्कम कुठे वापरावी?

ही अतिरिक्त बचत प्रकाश म्यूचुअल फंड SIP मध्ये गुंतवू शकतो. जर आपण ₹37,000 च्या ऐवजी फक्त ₹36,000 दरवर्षी गुंतवणूक केली (म्हणजे ₹3,000 प्रति महिना) आणि त्यावर 14% सरासरी रिटर्न मिळाले, तर गणित असं दिसेल:

  • 20 वर्षांनी → ₹35,20,422
  • 25 वर्षांनी → ₹70,33,921
  • 30 वर्षांनी → ₹1,37,98,862

(फ्लेक्सी कॅप किंवा मिड कॅप फंड लाँग टर्ममध्ये साधारण 15–18% रिटर्न देतात, पण आपण इथे सुरक्षित अंदाज 14% धरला आहे.)

इन्शुरन्स आणि गुंतवणूक वेगळे ठेवा

बर्‍याच जणांची चूक अशी होते की ते इन्शुरन्स + इन्व्हेस्टमेंट एकत्र असलेला प्लान घेतात. त्यांना वाटतं – “फक्त इन्शुरन्स घेतला तर पैसे वाया जातील, काही परत मिळणार नाही.”

पण खरी गोष्ट अशी आहे की –

  • इन्शुरन्स = सुरक्षा (फॅमिलीचं संरक्षण)
  • गुंतवणूक = संपत्ती निर्मिती (म्युच्युअल फंड, ETF इ.)

प्रत्येक प्रॉडक्टचं काम वेगळं असतं. इन्शुरन्स घ्या फक्त संरक्षणासाठी. गुंतवणूक करा फक्त संपत्ती निर्मितीसाठी.

माझा क्लायंट असो वा फॉलोवर, मी नेहमी हेच सांगतो – “Insurance हा खर्च नाही, तर सुरक्षिततेचा पाया आहे. Wealth तयार करायची असेल तर Mutual Funds सारखे प्रॉडक्ट वापरा.

ही पोस्ट वाचा: Mutual Fund SIP: ₹5000 मासिक गुंतवणुकीतून कसे झाले ₹89.6 लाख?

अंतिम विचार : कोणता मार्ग योग्य?

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा – SIP मध्ये गुंतवलेले पैसे नक्की मिळतात. कारण हे तुमचं इन्व्हेस्टमेंट आहे, जे मार्केटसोबत वाढत राहतं. पण टर्म इन्शुरन्समध्ये पैसे तेव्हाच मिळतात, जेव्हा जीवनाला धोका येतो किंवा Disability होते.
याचा उद्देश फक्त सुरक्षा आहे, इन्व्हेस्टमेंट नाही.

म्हणूनच जर प्रकाशने ₹15,000 वार्षिक प्रीमियम असलेला साधा टर्म प्लान घेतला, तर त्याला

  • मृत्यू झाल्यास → ₹1 कोटीची सुरक्षा
  • Disability झाल्यास → कव्हर मिळणारच आहे.

आणि उरलेले ₹37,000 तो SIP मध्ये गुंतवले, तर त्याला लाँग टर्ममध्ये मोठा कॉर्पस मिळेल. म्हणजेच दोन्ही गोष्टी साध्य –

  • सुरक्षा (Insurance)
  • संपत्ती निर्मिती (Investment)

आता प्रश्न फक्त इतकाच – तुम्ही कोणता मार्ग निवडाल – महागडा Insurance + Investment Plan की साधा Insurance आणि स्वतंत्र Investment?

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अभ्यासक आहेत. त्यांनी साडेचार वर्षे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत (Saraswat Bank) कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहकांच्या वित्तीय सेवांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. सध्या ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) मध्ये 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते सर्वसामान्य तसेच HNI गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात मदत करतात.
    ते NISM आणि SEBI सारख्या सरकारी संस्थांकडून मान्यताप्राप्त (Certified) असून, त्यांनी खालील महत्त्वाच्या परीक्षा पास केल्या आहेत:

    NISM Series V-A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM Series V-B: म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन

    NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM: म्युच्युअल फंड ऑपरेशन्स मॉड्यूल

    SEBI: इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन

    आपल्या याच अनुभवाच्या जोरावर साजन भुवड हे मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक बचतीबद्दल (Personal Finance) अगदी सोप्या आणि विश्वासाने समजेल अशा भाषेत लिहितात. सामान्य माणसाला पैशांचे योग्य निर्णय घेता यावेत, त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी आणि भविष्यात चांगली संपत्ती तयार व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top