Groww App चालत नाही! मग माझ्या गुंतवणुकीचं काय?

एका गुंतवणूकदाराने इंस्टाग्रामवर सांगितले की त्याचे Groww App ओपन होत नव्हते. पासवर्ड रिसेट करून पाहिला, तरीसुद्धा ऍप सुरू होत नव्हते. त्याला टेन्शन आले कारण त्याने बरीच गुंतवणूक Groww App मार्फत केली होती. Groww Support कडून रिप्लाय आला की Ticket Raise केल आहे. माझ्यामते लवकरच ऍप पुन्हा चालू होईल.

पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी – Groww, Zerodha, Paytm Money किंवा इतर अशा सर्व Investing Apps हे फक्त ब्रोकर / प्लॅटफॉर्म आहेत. तुमची खरी गुंतवणूक म्युच्युअल फंड कंपनीकडे (AMC) असते. त्यामुळे एखादे App तात्पुरते बंद झाले, लॉगिन प्रॉब्लेम आला, किंवा तांत्रिक अडचण झाली, तरी तुमचे पैसे सुरक्षित असतात.

तुम्ही थेट तुमच्या म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइट/मोबाइल App वरून किंवा ऑफलाइन फॉर्म भरून तुमचे पैसे रिडीम करू शकता. म्हणून अशा अडचणींमध्ये टेन्शन घेण्याची गरज नाही.

या घटनेतून गुंतवणूकदाराने काय शिकावे?

  1. आपले पैसे फक्त App मध्ये नसून AMC कडे गुंतवलेले आहेत हे समजून घ्या.
  2. नेहमी तुमच्या म्युच्युअल फंड AMC च्या वेबसाइट/कस्टमर केअरचा तपशील जवळ ठेवा.
  3. तांत्रिक अडचणी आल्या तर थेट AMC मार्फत व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

म्युच्युअल फंड सल्लागाराची भूमिका

जर तुम्ही स्वतः गुंतवणूक करत असाल तर चांगलेच आहे, पण अशा समस्या आल्या तर पुढे काय करावे हे समजत नसेल तर म्युच्युअल फंड सल्लागार खूप उपयोगी पडतो. सल्लागार तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून तुमचे व्यवहार सोपे करतो आणि अनावश्यक टेन्शन टाळतो. म्हणजेच, स्वतः गुंतवणूक करणे चांगले आहे, पण प्रोब्लेम आल्यावर मार्गदर्शनासाठी एक विश्वासार्ह सल्लागार असणे अजून सुरक्षिततेचे कवच आहे.

योग्य म्यूचुअल फंड सल्ला हवाय? जॉइन करा इथे 

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अभ्यासक आहेत. त्यांनी साडेचार वर्षे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत (Saraswat Bank) कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहकांच्या वित्तीय सेवांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. सध्या ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) मध्ये 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते सर्वसामान्य तसेच HNI गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात मदत करतात.
    ते NISM आणि SEBI सारख्या सरकारी संस्थांकडून मान्यताप्राप्त (Certified) असून, त्यांनी खालील महत्त्वाच्या परीक्षा पास केल्या आहेत:

    NISM Series V-A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM Series V-B: म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन

    NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM: म्युच्युअल फंड ऑपरेशन्स मॉड्यूल

    SEBI: इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन

    आपल्या याच अनुभवाच्या जोरावर साजन भुवड हे मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक बचतीबद्दल (Personal Finance) अगदी सोप्या आणि विश्वासाने समजेल अशा भाषेत लिहितात. सामान्य माणसाला पैशांचे योग्य निर्णय घेता यावेत, त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी आणि भविष्यात चांगली संपत्ती तयार व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top