Small Cap Funds मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे ३ कटू सत्य जाणून घ्या

सध्या मार्केटमध्ये Small Caps ची खूप चर्चा आहे आणि ते सर्वांनाच आकर्षित करत आहेत. यातून खूप जास्त returns मिळतील या आशेने अनेक जण यात पैसे गुंतवत आहेत आणि स्वतःला सांगत आहेत की, “मी मार्केटची risk घेऊ शकतो.” पण मित्रांनो, DSP Mutual Fund च्या एका खास अभ्यासातून एक अतिशय महत्त्वाचे वास्तव समोर आले आहे. जेव्हा मार्केट मोठ्या प्रमाणात क्रॅश होत तेव्हा तुम्ही काय करता! जर तुम्ही Small Cap investment करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

सत्य १: Small Caps फक्त पडत नाहीत, ते थेट कोसळतात

जेव्हा मार्केटमध्ये संकट येते, तेव्हा देशातील मोठ्या कंपन्यांच्या (Large Caps) तुलनेत Small Cap कंपन्यांचे शेअर्स खूप वेगाने आणि प्रचंड प्रमाणात खाली कोसळतात.

DSP Mutual Fund च्या अभ्यासात भारताच्या टॉप 50 कंपन्या (Nifty 50) आणि Small Cap कंपन्यांच्या इतिहासातील घसरणीची तुलना केली आहे:

ऐतिहासिक संकट (Crisis)भारतातील 50 मोठ्या कंपन्या (Nifty 50 TRI)भारतातील Small Cap कंपन्या (Nifty Smallcap 250 TRI)
2008 Global Financial Crisis-59%-73%
2018 NBFC / IL&FS Freeze-14%-36%
2020 Covid Crash-38%-43%
2025 Correction-8%-24%
(Source: NSE, Data as on 31 Mar 2026)

जर तुमचा पोर्टफोलिओ 73% ने खाली गेला, तर तो पुन्हा मूळ जागी येण्यासाठी त्याला फक्त 73% वाढून चालत नाही. गणितीयदृष्ट्या, गमावलेले पैसे परत मिळवण्यासाठी तब्बल 270% ची वाढ (gain) हवी असते. Recovery नक्की होते, पण त्यासाठी प्रचंड संयम लागतो.

share market crash in marathi

फक्त पडणे ही अर्धीच गोष्ट आहे, मार्केटला पुन्हा वर यायला किती वेळ लागतो ते पाहा:

  • 2008 चा क्रॅश: आधीच्या High पातळीवर यायला 6 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला.
  • 2018 ची घसरण: रिकव्हरीसाठी सुमारे 3 वर्षे लागली.
  • 2024 चा फॉल: रिकव्हरीसाठी आतापर्यंत 18 महिने लागले आहेत.

मार्केट पडते तेव्हा तुमच्या हिमतीची परीक्षा असते आणि जेव्हा मार्केट रिकव्हर होत असते तेव्हा तुमच्या संयमाची परीक्षा असते.

सत्य २: Small Caps दर दोन वर्षांनी साधारण २०% ने खाली येतात

Small Cap मार्केट कधीच एका सरळ रेषेत वर जात नाही. गेल्या 20 वर्षांचा इतिहास पाहिला, तर Small Cap इंडेक्स दर दोन वर्षांनी एकदा तरी 20% पेक्षा जास्त पडतोच.

  • Nifty 50 (Large Cap): गेल्या 20 वर्षांत एका वर्षाच्या आत 20% पेक्षा जास्त घसरण फक्त 4 वेळा झाली (म्हणजे सरासरी दर 5 वर्षांतून एकदा).
  • Nifty Smallcap 250: या उलट, स्मॉल कॅपमध्ये अशी घसरण 12 वेळा झाली (म्हणजे सरासरी दर 2 वर्षांतून एकदा).

एक नवीन गुंतवणूकदार मार्केट एकदम वाढलेले असताना (High वर) पैसे गुंतवतो आणि मार्केट 20% खाली गेल्यावर घाबरून लॉस बुक करतो (विकून टाकतो). इथेच त्याचे नुकसान खरे होते. पण एक हुशार गुंतवणूकदार या घसरणीकडे ‘buy on dips’ (कमी किमतीत आणखी युनिट्स खरेदी करण्याची संधी) म्हणून पाहतो. Small caps मध्ये घसरण होणे हा एक प्रवासाचा सामान्य भाग आहे.

सत्य ३: टिकून राहणाऱ्यांना मिळणारे खरे Rewards

म्युच्युअल फंडाच्या जाहिरातींमध्ये अनेकदा ‘सुरुवातीपासूनचे’ (Since Inception) खूप मोठे returns दाखवले जातात, पण ते तुमचे वास्तव नसते. तुमचे रिर्टन्स हे तुम्ही कधी एंट्री केली यावर अवलंबून असतात.

DSP चा अभ्यास दाखवतो की तुम्ही कधी गुंतवणूक सुरू केली, यानुसार १ लाख रुपयांचे काय झाले:

तुमची Entry (गुंतवणुकीची वेळ)1 लाख रुपयांचे झालेAnnual Return (CAGR)
वाईट वेळ: 2008 क्रायसिसच्या अगदी आधी~ 4.3 लाख रुपये~ 8%
चांगली वेळ: 2008 क्रायसिसच्या तळाला (Bottom)~ 17.7 lakh रुपये~ 18%
नुकतीच वाईट वेळ: Covid च्या आधी, Jan 2020~ 2.9 लाख रुपये~ 19%
नुकतीच चांगली वेळ: Covid च्या तळाला, Mar 2020~ 5.0 लाख रुपये~ 31%
शिस्तबद्ध गुंतवणूकदार: 10-वर्षांची SIP (No timing)~ 16% (Median)

यावरून काय शिकायला मिळते?

2008 मध्ये गुंतवणूक सुरू करण्याच्या वेळेत फक्त एका वर्षाचा फरक होता, पण मॅच्युरिटीच्या रक्कमेत तब्बल 13 लाख रुपयांचा फरक पडला! 2020 मध्ये केवळ दोन महिन्यांच्या फरकाने 2 लाख रुपयांचा फरक पडला. गुंतवणूक सारखीच होती, पण ‘Market Timing’ मुळे निकाल बदलला.

मग आपण मार्केट Time करायचे का? नाही! कारण 2008 मध्ये मार्केट पडणार आहे किंवा 2020 च्या मार्चमध्येच मार्केट एकदम तळाला आहे, हे जगातील मोठ्या फंड मॅनेजर्सना (Fund Managers) देखील अचूक ओळखता येत नाही.

यावर सर्वात सोपा उपाय SIP. जेव्हा मार्केट पडते, तेव्हा तुमची SIP आपोआप स्वस्त भावात जास्त युनिट्स खरेदी करते. इतिहास साक्षी आहे की, या इंडेक्समध्ये 10 वर्षांची SIP करणाऱ्यांना सरासरी 16% CAGR परतावा मिळाला आहे आणि काही चांगल्या काळात तो 22% CAGR पर्यंतही गेला आहे.

Small Cap चे फायदे, धोके आणि Eligibility

१. फायदे (Benefits):

  • हाय ग्रोथ पोटेन्शियल: आजच्या लहान कंपन्या उद्याच्या मोठ्या कंपन्या बनू शकतात, ज्यामुळे दीर्घकाळात संपत्ती (Wealth Creation) निर्माण होते.

२. धोके (Risks & Limitations):

  • कमालीचे उतार-चढाव (High Volatility): हे फंड जेवढ्या वेगाने वर जातात, तेवढ्याच वेगाने खाली येतात.
  • लिक्विडिटी रिस्क (Liquidity Risk): मार्केट खराब असताना फंड मॅनेजरला छोट्या कंपन्यांचे शेअर्स विकणे कधीकधी कठीण होते.

३. कोणी गुंतवणूक करावी? (Eligibility):

  • ज्यांचा गुंतवणुकीचा काळ (Time Horizon) किमान 7 ते 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.
  • जे मार्केट 25-30% पडल्यावरही आपली SIP घाबरून बंद करत नाहीत.

Common Mistakes आणि Expert Tips

  • सर्वात मोठी चूक: मार्केट खाली गेल्यावर किंवा पोर्टफोलिओ लाल रंगात दिसू लागल्यावर घाबरून SIP थांबवणे. लक्षात ठेवा, मार्केट पडलेले असतानाच तुम्हाला सर्वात स्वस्त युनिट्स मिळतात, जे नंतर मार्केट वाढल्यावर मोठा फायदा देतात.
  • दुसरी चूक: गेल्या 1-2 वर्षांचे आकर्षक परतावे (Past Returns) पाहून सर्व पैसे एकाच वेळी (Lump sum) गुंतवणे.
  • Expert Tip: Small Cap मध्ये कधीही ऑल-इन (सगळे पैसे) करू नका. तुमच्या एकूण पोर्टफोलिओमधील ठराविक हिस्साच यात गुंतवा आणि गुंतवणुकीसाठी SIP चा मार्ग निवडा.

निष्कर्ष

DSP Mutual Fund चा हा अभ्यास आपल्याला स्पष्ट सांगतो की, Small Cap Mutual Funds मधून चांगला परतावा मिळवणे सोपे नाही. यासाठी तुम्हाला मार्केटचे मोठे चटके सहन करावे लागतील. जे गुंतवणूकदार बाजारातील घसरणीला (Dip) घाबरत नाहीत आणि आपली SIP शिस्तीने चालू ठेवतात, त्यांनाच संपत्ती निर्मितीचा खरा परतावा मिळतो. हाय रिर्टन्स फक्त जाहिरातींच्या पानांवर छान दिसतात, पण ते प्रत्यक्षात त्यांनाच मिळतात जे अडचणीच्या काळातही मार्केट सोडून कधीच पळून गेले नाहीत!

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अभ्यासक आहेत. त्यांनी साडेचार वर्षे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत (Saraswat Bank) कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहकांच्या वित्तीय सेवांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. सध्या ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) मध्ये 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते सर्वसामान्य तसेच HNI गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात मदत करतात.
    ते NISM आणि SEBI सारख्या सरकारी संस्थांकडून मान्यताप्राप्त (Certified) असून, त्यांनी खालील महत्त्वाच्या परीक्षा पास केल्या आहेत:

    NISM Series V-A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM Series V-B: म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन

    NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM: म्युच्युअल फंड ऑपरेशन्स मॉड्यूल

    SEBI: इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन

    आपल्या याच अनुभवाच्या जोरावर साजन भुवड हे मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक बचतीबद्दल (Personal Finance) अगदी सोप्या आणि विश्वासाने समजेल अशा भाषेत लिहितात. सामान्य माणसाला पैशांचे योग्य निर्णय घेता यावेत, त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी आणि भविष्यात चांगली संपत्ती तयार व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top