Parag Parikh Flexi Cap Fund मध्ये मोठा बदल, गुंतवणूकदारांनो लक्ष द्या!

Parag Parikh Flexi Cap Fund हा भारतातील एक लोकप्रिय म्युच्युअल फंड आहे. या फंडाची खासियत म्हणजे तो मोठ्या कंपन्यांमध्येच नव्हे तर मध्यम आणि छोट्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक करतो. त्याचबरोबर भारतीय शेअर्ससोबत आंतरराष्ट्रीय शेअर्समध्येही गुंतवणूक केल्यामुळे विविधता मिळते. आतापर्यंत या फंडामध्ये फक्त Growth Option होता, पण 31 ऑक्टोबर 2025 पासून गुंतवणूकदारांना IDCW म्हणजेच Income Distribution cum Capital Withdrawal हा नवा पर्यायही उपलब्ध होतोय.

IDCW म्हणजे काय?

IDCW म्हणजे फंडाने केलेल्या नफ्यापैकी काही भाग गुंतवणूकदारांना परत देणे. हा पैसा थेट खात्यात जमा होऊ शकतो किंवा पुन्हा त्याच फंडामध्ये गुंतवला जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना नियमित रोख प्रवाह मिळतो आणि गुंतवणुकीवर काही प्रमाणात परतावा हातात येतो.

कराच्या दृष्टीने तुलना

IDCW मधून मिळालेला पैसा हा तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरला जातो आणि त्यावर तुमच्या करस्लॅबप्रमाणे आयकर लागतो. Growth Option मध्ये मात्र फक्त युनिट विकल्यावर झालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर बसतो आणि तोही फक्त 12.5 टक्के फ्लॅट असतो. त्यामुळे बहुतांश गुंतवणूकदारांसाठी Growth Option कराच्या दृष्टीने अधिक फायद्याचा ठरतो.

वाचा | Zerodha Mutual Fund आता ONDC वर, म्युच्युअल फंडाची खरेदी झाली अगदी ऑनलाइन शॉपिंगसारखी!

IDCW वितरण प्रक्रिया

फंडाचे Trustees किती रक्कम वाटायची ते ठरवतात आणि AMC त्याची सार्वजनिक सूचना देते. ही सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांनी Record Date जाहीर केली जाते. त्या दिवशी फंडातील नोंदणीकृत युनिटहोल्डर्स IDCW साठी पात्र ठरतात. Record Date नंतर NAV म्हणजेच युनिटची किंमत IDCW रकमेइतकी कमी होते.

कोणता पर्याय निवडावा?

जर तुमचं उद्दिष्ट दीर्घकालीन गुंतवणूक आणि संपत्ती निर्मिती असेल, तर Growth Option हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण जर तुम्हाला गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न हवं असेल आणि तुम्ही कमी करस्लॅबमध्ये येत असाल, तर IDCW पर्याय तुमच्यासाठी अधिक योग्य ठरू शकतो.

निष्कर्ष

Parag Parikh Flexi Cap Fund मध्ये IDCW हा नवा पर्याय सुरू झाल्याने गुंतवणूकदारांना जास्त लवचिकता मिळाली आहे. मात्र कराच्या दृष्टीने Growth Option अजूनही बहुतांश लोकांसाठी अधिक फायद्याचा आहे. IDCW हा पर्याय प्रामुख्याने त्यांच्यासाठी योग्य आहे ज्यांना गुंतवणुकीतून नियमित रोख प्रवाहाची गरज आहे.

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अभ्यासक आहेत. त्यांनी साडेचार वर्षे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत (Saraswat Bank) कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहकांच्या वित्तीय सेवांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. सध्या ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) मध्ये 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते सर्वसामान्य तसेच HNI गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात मदत करतात.
    ते NISM आणि SEBI सारख्या सरकारी संस्थांकडून मान्यताप्राप्त (Certified) असून, त्यांनी खालील महत्त्वाच्या परीक्षा पास केल्या आहेत:

    NISM Series V-A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM Series V-B: म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन

    NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM: म्युच्युअल फंड ऑपरेशन्स मॉड्यूल

    SEBI: इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन

    आपल्या याच अनुभवाच्या जोरावर साजन भुवड हे मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक बचतीबद्दल (Personal Finance) अगदी सोप्या आणि विश्वासाने समजेल अशा भाषेत लिहितात. सामान्य माणसाला पैशांचे योग्य निर्णय घेता यावेत, त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी आणि भविष्यात चांगली संपत्ती तयार व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top