पराग परिख फ्लेक्सी कॅप फंड गुंतवणूकदारांनी जाणून घ्यायलाच हवे असलेले महत्वाचे नियम | Cut Off Time for Parag Parikh Flexi Cap Fund

Mutual fund गुंतवणुकीत Cut-off time म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये व्यवहार केल्यावर कोणत्या दिवसाची NAV (Net Asset Value) लागू होणार हे ठरवणारा नियम. पराग परिख फ्लेक्सी कॅप फंडसाठी (किंवा इतर कोणत्याही फंडसाठी) हा Cut-off 3:00 p.m. आहे. यानंतर व्यवहार केल्यास पुढच्या Business Day चा NAV लागू होतो. NAV म्हणजे म्युच्युअल फंडच्या एका युनिटसाठी दिली जाणारी किंमत.

Mutual Fund Purchase किंवा Switch-in करताना Cut-off

जर तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा अर्ज आणि पैसे दोन्ही 3:00 p.m. आधी फंड हाऊसकडे पोहोचले तर त्याच दिवशीची NAV मिळते. उशिरा पाठवल्यास पुढच्या दिवसाची NAV लागू होते. काही Payment modes मध्ये Cut-off वेगळा असतो, जसे UPI साठी 2:45 p.m. आणि NEFT साठी 1:00 p.m.

Redemption (Selling किंवा Switch-out) करताना Cut-off

रिडेम्प्शनसाठीही Cut-off नियम सारखेच आहेत. जर पैसे काढण्याची विनंती 3:00 p.m. आधी केली, तर त्याच दिवशीची NAV लागू होते. पण जर विनंती 3:00 p.m. नंतर आली, तर पुढच्या Business Day ची NAV लागू होते.

Mutual Fund नियम व लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे

SEBI च्या नियमांनुसार अर्जाची वेळ नव्हे तर पैसे Fund house कडे पोहोचल्याची वेळ महत्त्वाची आहे. Zerodha, Groww सारख्या platforms वर Cut-off वेळ लवकर असू शकते. तसेच शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी केलेले व्यवहार पुढच्या Business day ला process होतात.

Mutual Funds मध्ये Cut-off का महत्वाचा आहे?

Cut-off time पाळल्याने योग्य NAV मिळतो. वेळ चुकल्यास व्यवहार पुढे ढकलला जातो, ज्यामुळे किंमतीत फरक पडू शकतो. म्हणून Parag Parikh Flexi Cap Fund सारख्या Mutual fundमध्ये गुंतवणूक करताना Cut-off वेळ नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

वाचा: म्युच्युअल फंड रिटर्न वेगळे का दिसतात? जाणून घ्या कारण! | Mutual Fund Returns Mismatch

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अभ्यासक आहेत. त्यांनी साडेचार वर्षे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत (Saraswat Bank) कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहकांच्या वित्तीय सेवांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. सध्या ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (ICICI Prudential Mutual Fund) मध्ये 'रिलेशनशिप मॅनेजर' म्हणून कार्यरत आहेत. तिथे ते सर्वसामान्य तसेच HNI गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवडण्यात आणि पैशांचे योग्य नियोजन करण्यात मदत करतात.
    ते NISM आणि SEBI सारख्या सरकारी संस्थांकडून मान्यताप्राप्त (Certified) असून, त्यांनी खालील महत्त्वाच्या परीक्षा पास केल्या आहेत:

    NISM Series V-A: म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM Series V-B: म्युच्युअल फंड फाउंडेशन सर्टिफिकेशन

    NISM Series XXI-A: पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (PMS) डिस्ट्रिब्युटर सर्टिफिकेशन

    NISM: म्युच्युअल फंड ऑपरेशन्स मॉड्यूल

    SEBI: इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन

    आपल्या याच अनुभवाच्या जोरावर साजन भुवड हे मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि वैयक्तिक बचतीबद्दल (Personal Finance) अगदी सोप्या आणि विश्वासाने समजेल अशा भाषेत लिहितात. सामान्य माणसाला पैशांचे योग्य निर्णय घेता यावेत, त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी आणि भविष्यात चांगली संपत्ती तयार व्हावी, हेच त्यांचे ध्येय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top