Mutual Fund SIP: जास्त पगार असूनही संपत्ती कमी का? खरी गुरुकिल्ली आहे बचतीचा दर?

Mutual Fund SIP: बहुतेक लोक मित्र, सहकारी किंवा नातेवाईकांशी आपला पगार तुलना करतात. जास्त पगार म्हणजे यश आणि कमी पगार म्हणजे निराशा असे वाटते. पण या तुलनेचा खऱ्या आर्थिक स्थितीवर फारसा परिणाम होत नाही. भविष्यासाठी आपण किती बाजूला ठेवतो म्हणजे तुमच्या बचतीचा दर, हाच खरा संपत्ती निर्माण करणारा घटक आहे.

अजय आणि राजची गोष्ट – एक उदाहरण

दोन नवे पदवीधर बघूया: अजय दरमहा ₹25,000 कमावतो, तर राजला फक्त ₹18,000 मिळतात. अस बघायला गेलो तर अजयला जास्त फायदा वाटतो. पण जवळून पाहता चित्र वेगळे दिसते.

  • राज दरमहा ₹9,000 वाचवतो आणि Mutual Fund SIP मध्ये गुंतवणूक करतो.
  • अजय फक्त ₹4,000 वाचवतो. (बाकीचे बाहेर जेवण आणि इतर शौक)

काळ जसजसा पुढे जातो, तसतसे राजचे शिस्तबद्ध SIP गुंतवणूक अजयच्या जास्त पगारापेक्षा जास्त संपत्ती निर्माण करते.

पगारापेक्षा बचतीचा दर का महत्त्वाचा?

जास्त पगार पण कमी बचत म्हणजे गळक्या बादलीतले पाणी – लगेच संपते. राजचे उदाहरण स्पष्ट दाखवते की संपत्ती निर्माण करणे म्हणजे पगारावर अवलंबून नसून आपण किती टक्के बचत आणि गुंतवणूक करतो यावर अवलंबून असते. बचतीचा दर जितका जास्त, तितके Investment मध्ये पैसा जास्त गुंतवता येतो आणि कंपाउंडिंगचा जादू आपल्यासाठी काम करू लागतो. यामुळे आर्थिक सुरक्षितता मिळते आणि भविष्यात स्वातंत्र्यही.

म्युच्युअल फंड SIP गुंतवणुकीचे फायदे

  • दरमहा नियमित बचत करण्याची सवय लागते.
  • रुपया-खर्च सरासरीमुळे बाजारातील चढ-उताराचा कमी धोका.
  • दीर्घकाळात कंपाउंडिंगमुळे गुंतवणुकीची ताकद प्रचंड वाढते.
  • SIP अगदी परवडणाऱ्या रकमेपासून (₹500) सुरू करता येतो.

म्हणून Mutual Fund SIP हा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी सर्वोत्तम मार्गांपैकी एक आहे.

वाचा | Top 5 Mutual Funds: मागील 5 वर्षात सर्वात जास्त रिटर्न देणारे 5 म्युच्युअल फंड हे आहेत!

राज Vs अजय – SIP परतावा तुलना

गुंतवणूकदारमासिक SIP10 वर्षे (14% परतावा)15 वर्षे (14% परतावा)20 वर्षे (14% परतावा)
राज₹9,000₹ 22,43,631₹50,86,864₹1,05,61,267
अजय₹4,000₹ 9,97,169₹22,60,829₹46,93,897

अजयला जास्त पगार असूनही राजचा शिस्तबद्ध SIP आणि जास्त बचतीचा दर यामुळे 20 वर्षांत त्याची संपत्ती दुपटीहून अधिक होते.

बचतीचा दर कसा वाढवावा

  • महिन्याच्या उत्पन्न-खर्चाचा हिशेब ठेवा.
  • आधी बचत ठरवा, नंतर खर्च करा.
  • SIP आपोआप बँकेतून जाण्यासाठी ऑटो डेबिट लावा.
  • पगार वाढल्यावर जीवनशैली वाढवण्याऐवजी जादा उत्पन्न SIP मध्ये टाका.

थोडे थोडे बदल केल्यास बचतीचा दर वाढतो आणि भविष्यात मोठा परिणाम दिसून येतो.

निष्कर्ष

खरे आर्थिक यश जास्त कमावण्यात नाही, तर जास्तीत जास्त वाचवण्यात आणि गुंतवणुकीत आहे. पगाराची तुलना करून काही साध्य होत नाही. त्याऐवजी आपल्या बचतीच्या दराची तुलना करा. राजप्रमाणे कमी पगार असतानाही सातत्याने जास्त गुंतवणूक केल्यास, आपणही दीर्घकालीन संपत्ती आणि स्वातंत्र्य मिळवू शकता. नियमित बचत, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि कंपाउंडिंगची ताकद – हाच आर्थिक यशाचा मार्ग आहे.

Author

  • नमस्कार! मी साजन, AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड सल्लागार (ARN - 317145) आणि 4 वर्षांचा बँकिंग अनुभव असलेला म्युच्युअल फंड गुंतवणूक मार्गदर्शक. या ब्लॉगवर मी म्युच्युअल फंड समीक्षा (Review), माझे वैयक्तिक गुंतवणूक अनुभव आणि सोप्या भाषेत गुंतवणुकीचे मार्गदर्शन शेअर करतो. माझं उद्दिष्ट आहे की तुमचे आर्थिक निर्णय अधिक सोपे, योग्य आणि आत्मविश्वासपूर्ण व्हावेत.

Leave a Comment