भारतात रिटायरमेंटबाबत विचार केला की, जे लोक नोकरी करतात ते EPF (Employee Provident Fund) निवडतात किंवा कंपनीकडून EPF ची सुविधा पुरवली जाते. पण आजच्या काळात EPF मधील 8.10% ते 8.65% परतावा (return) पुरेसा नाही. महागाई (inflation) 6-8% असल्याने वास्तविक संपत्ती वाढत नाही. यावर उपाय म्हणजे Mutual Fund SIP.
Mutual Fund SIP – छोट्या रकमेपासून मोठी संपत्ती
जर तुम्ही 25-30 वयोगटात असाल आणि नोकरी करत असाल आणि दरमहा थोडीशी रक्कम SIP (Systematic Investment Plan) मध्ये गुंतवली, तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकता आणि रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता. कारण Mutual Fund SIP मध्ये सातत्याने गुंतवणूक आणि कंपाऊंडिंगचा (compounding) जबरदस्त फायदा मिळतो. पण Mutual Fund SIP कोणत्या फंडमध्ये करू? हा प्रश्न आहेच.
Flexi Cap Fund का निवडावा?
Flexi Cap Fund मध्ये मोठ्या, मध्यम आणि लहान सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे फंड एक असला तरी मार्केटच्या सगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे रिटर्न पण चांगले मिळतात. उदाहरण घ्यायच झाल तर Parag Parikh Flexi Cap Fund – या फंडाने स्थापनेपासून 19.79% रिटर्न दिला आहे. पण एक सोप गणित करण्यासाठी आपण 14% वार्षिक रिटर्न गृहित धरू.
₹2,500 SIP चे भविष्यातील मूल्य – गणित बघा!
मानूया, तुमचा पगार ₹25,000 आहे. त्यातील 10%, म्हणजेच ₹2,500 SIP मध्ये गुंतवा आणि दरवर्षी 10% ने SIP वाढवा. (आता 10% ने का वाढवायच? हा प्रश्न मनात येतो. तर याच कारण अस की महागाई 6-8% ने दरवर्षी वाढत असते. मग तुमची गुंतवणूक पण वाढली पाहिजे. तरच तुम्ही महागाईच्या पुढे राहणार)
- 2,500 ची SIP, 30 वर्षे, 14% रिटर्न, 10% स्टेप अप
- 25 वर्षांनी मिळणारी रक्कम: ₹1,25,91,418
- 30 वर्षांनी मिळणारी रक्कम: ₹2,69,92,792
Assetplus App वर रजिस्टर करा आणि योग्य म्यूचुअल फंड गुंतवणूक सल्ला मिळवा!
25 वर्ष ते 30 वर्ष अशा फक्त 5 वर्षांच्या फरकात जवळपास दुप्पट रक्कम मिळते – हीच आहे SIP आणि कंपाऊंडिंगचं जादू!
Rs 2,500 ची SIP पुढच्या 30 वर्षात किती होईल ते बघा. आता काहीना ही रक्कम खूप मोठी वाटेल. पण लक्षात घ्या या पुढील 3 वर्षात तुमची इन्कम वाढेल. आजची सॅलरी एवढीच राहणार नाही)
| Year | Monthly SIP (₹) |
|---|---|
| 1 | 2,500 |
| 2 | 2,750 |
| 3 | 3,025 |
| 4 | 3,328 |
| 5 | 3,661 |
| 6 | 4,027 |
| 7 | 4,430 |
| 8 | 4,873 |
| 9 | 5,360 |
| 10 | 5,896 |
| 11 | 6,486 |
| 12 | 7,135 |
| 13 | 7,849 |
| 14 | 8,634 |
| 15 | 9,497 |
| 16 | 10,447 |
| 17 | 11,491 |
| 18 | 12,640 |
| 19 | 13,904 |
| 20 | 15,294 |
| 21 | 16,823 |
| 22 | 18,505 |
| 23 | 20,356 |
| 24 | 22,392 |
| 25 | 24,631 |
| 26 | 27,094 |
| 27 | 29,803 |
| 28 | 32,783 |
| 29 | 36,061 |
| 30 | 39,667 |
निवृत्ती नियोजनासाठी टिप्स
- पगाराचा किमान 10% SIP मध्ये गुंतवा
- दरवर्षी SIP 10% ने वाढवा.
- 30 वर्षे गुंतवणूक थांबवू नका, पैसे काढू नका (फक्त एक SIP खास रिटायरमेंटच्या नावाने)
- SIP ला EPF सारखं वागवा – दीर्घकालीन, शिस्तबद्ध गुंतवणूक
SIP ही भविष्याची खरी खात्री!
EPF सारखी सुरक्षितता हवी आणि उच्च परतावा हवा असेल, तर Flexi Cap Fund मध्ये SIP हा उत्तम पर्याय आहे. आजच सुरुवात करा आणि निवृत्तीला करोडपती बना!
वाचा: HDFC Flexi Cap Fund: 5 वर्षांत दुप्पट रिटर्न देणारा फंड, जाणून घ्या संपूर्ण माहिती!