Canara Robeco Flexi Cap Fund मध्ये सप्टेंबर 2003 म्हणजेच सुरुवात झाल्यापासून दर महिन्याला ₹5000 SIP केल्यास ऑगस्ट 2025 पर्यंत ती गुंतवणूक तब्बल ₹89,64,137 झाली आहे. ही आकडेवारी दाखवते की Mutual Fund SIP मध्ये दीर्घकाळ शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास किती मोठा फायदा होऊ शकतो.
SIP Returns ची माहिती
या Mutual Fund SIP मध्ये 22 वर्षांत गुंतवणूकदाराने एकूण ₹13,20,000 इतकी रक्कम टाकली आहे. या गुंतवणुकीवर वार्षिक परताव्याचा दर (XIRR) 15.04% इतका मिळाला आहे. याचा अर्थ एवढ्या मोठ्या काळात पैसे फक्त थोडेफार वाढले नाहीत तर Compounding च्या ताकदीमुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Fund Performance ची तुलना (CAGR vs Benchmark)
Canara Robeco Flexi Cap Fund ने स्थापनेपासून 17.37% CAGR परतावा दिला आहे. हा परफॉर्मन्स Benchmark BSE 500 TRI (16.13%) आणि BSE Sensex TRI (16.61%) पेक्षा जास्त आहे. याशिवाय, जर कोणी फक्त ₹10,000 lump sum 2003 मध्ये गुंतवले असते, तर ती रक्कम आज ₹3.37 लाख झाली असती, जे Benchmark index पेक्षा खूप चांगले आहे. हे Canara Robeco Flexi Cap Fund च्या consistency आणि discipline चे उदाहरण आहे.
Flexi Cap Fund म्हणजे काय? (SEBI Definition)
SEBI च्या मते Flexi Cap Fund हा equity mutual fund आहे ज्यामध्ये किमान 65% गुंतवणूक इक्विटीमध्ये (large-cap, mid-cap आणि small-cap) असणे बंधनकारक आहे. या फंडामध्ये फंड मॅनेजरला पूर्ण स्वातंत्र्य असते की कुठल्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये किती गुंतवणूक करायची. यामुळे हा फंड वेगवेगळ्या मार्केट कॅपमध्ये संतुलन साधतो आणि गुंतवणूकदाराला diversification मिळते.
Canara Robeco Flexi Cap Fund ची वैशिष्ट्ये
Canara Robeco Flexi Cap हा फंड open-ended dynamic equity scheme आहे ज्यामध्ये large-cap, mid-cap आणि small-cap मध्ये गुंतवणूक केली जाते. यामध्ये growth आणि value investing style यांचा योग्य मेळ घातला जातो. फंड मॅनेजर्स bottom-up stock selection आणि top-down sector allocation या दोन पद्धती वापरतात.
या योजनेत 65% ते 100% इक्विटीमध्ये, 0% ते 35% debt व money market instruments मध्ये आणि जास्तीत जास्त 10% REITs व InvITs मध्ये गुंतवणूक करता येते. हा फंड Shridatta Bhandwaldar आणि Pranav Gokhale यांच्या व्यवस्थापनाखाली चालतो.
जोखीम आणि सल्ला
Flexi Cap Funds हे equity आधारित असल्याने market volatility आणि sector-specific risks ला बळी पडतात. short-term मध्ये ups and downs येऊ शकतात. त्यामुळे फक्त short-term साठी या फंडात गुंतवणूक करणे योग्य नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या financial advisor शी चर्चा करणे नेहमीच योग्य ठरते. कारण प्रत्येक गुंतवणूकदाराचे goals, risk appetite आणि horizon वेगवेगळे असतात.
विचार करा
काही लोक म्हणतील – “अरे, 22 वर्षं कोण पैसे गुंतवतो?” पण खरी गोष्ट हीच आहे की आपल्याला long term साठी गुंतवणूक करावी लागते. आपण अनेकदा 3-4 SIP सुरू करतो, आणि गरज पडली की काही redeem करतो. पण किमान एक SIP तरी long term साठी कायम ठेवली पाहिजे.
हाच खरा wealth creation चा मंत्र आहे. आपण इथे फक्त ₹5000 SIP चे उदाहरण घेतले आहे, आणि त्याने एवढा मोठा corpus तयार केला. कल्पना करा, तुमचं उत्पन्न जसजसं वाढेल, तसतसे तुम्ही ₹10,000 किंवा ₹15,000 गुंतवायला लागलात, तर किती प्रचंड संपत्ती निर्माण होऊ शकते!
निष्कर्ष
Canara Robeco Flexi Cap Fund ने गेल्या 22 वर्षांत SIP आणि Compounding ची ताकद स्पष्ट करून दाखवली आहे. फंडाने Benchmark पेक्षा चांगला परफॉर्मन्स देऊन स्वतःला सिद्ध केले आहे. जर तुम्ही दीर्घकाळासाठी wealth निर्माण करू इच्छित असाल तर अशा Flexi Cap Funds तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणे आवश्यक आहे.
वाचा: Best Small Cap Fund: 10 वर्षांत दिला सर्वाधिक SIP रिटर्न!