Mutual Funds Vs Stocks: तुमच्यासाठी योग्य गुंतवणूक कोणती?

Mutual Funds Vs Stocks? लोकांना वाटतं हा रिटर्नचा प्रश्न आहे. पण खरं सांगू? हा लाइफस्टाईलचा प्रश्न आहे.

तुम्ही शेअर मार्केटसोबत दररोज जगणार आहात का? की तुमचं आयुष्य आधीच बिझी आहे — Job, Traffic, EMI, Weekend Plans?

कारण गुंतवणूक तुमच्या वेळेशी जुळली नाही, तर स्ट्रॅटजी काहीही असो — गुंतवणूक टिकत नाही.

Mutual Funds Vs Stocks: समस्या कुठे सुरू होते?

पुण्यात राहणारा 32 वर्षांचा संकेत. सॅलरी ₹50,000. गुंतवणूक सुरू करायची ठरवतो.

तो शेअर मार्केटमध्ये एंट्री घेतो. पहिल्या महिन्यात प्रॉफिट. दुसऱ्या महिन्यात Volatility. तिसऱ्या महिन्यात लॉस.

आता तो रोज चार्ट पाहतो. मीटिंगमध्ये पण नोटिफिकेशन चेक करतो. एका दिवशी तो म्हणतो — “मी पैसे इन्वेस्ट केलेत की टेंशन?”

इथेच गुंतवणुकीची ची खरी गोष्ट सुरू होते.

Mutual Funds Vs Stocks: शेअर्स म्हणजे एकच झाड लावणे!

शेअर घेतला म्हणजे एका कंपनीमध्ये भागीदारी.

कंपनी वाढली → पैसा वाढतो (Titan, Avenue Supermarkets)
कंपनी अडचणीत → पैसा कमी (VI, Reliance, Paytm)

ही एक focused Bet असते.

तुम्ही एका झाडाला सगळं पाणी घालताय. ते झाड मोठं झालं तर सावली भारी. पण तेच वाळलं. तर पूर्ण बाग रिकामी.

म्हणून शेअर्समध्ये Reward मोठा, पण प्रॉफिट होईल की लॉस हे सांगण कठीण.

Mutual Funds Vs Stocks: म्युच्युअल फंड म्हणजे पूर्ण बाग

म्युच्युअल फंडमध्ये तुमचे पैसे अनेक कंपन्यांमध्ये पसरतात. एक कंपनी चुकली तरी पोर्टफोलियो तुटत नाही.

फंड मॅनेजर १०० ते १५० स्टॉक्समध्ये पैसे इन्वेस्ट करतो. एका स्टॉक्सवर अवलंबून राहत नाही.

इथे Excitement कमी असते. पण सातत्य जास्त असते.

Mutual Funds Vs Stocks: फरक कुठे जाणवतो?

गोष्टशेअर्सम्युच्युअल फंड्स
लक्षएक कंपनीअनेक कंपन्या
वेळरोज द्यावा लागतोमहिन्यात १० मिनिटे
सुरुवातमोठी रक्कमSIP ₹500
भावनाHigh ups & downsSmooth ride
Compoundingवारंवार तुटतंसतत चालू

Mutual Funds vs Stocks: रक्कम कमी पडते?

नवीन गुंतवणूकदाराची सगळ्यात कॉमन अडचण काय असते माहितीये? ज्ञान नाही — पैसे कमी असतात.

तुम्ही quality stock घ्यायला जाता. एका share ची किंमत ₹500, ₹1,200, कधी ₹2,000+. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही एका कंपनीवरच bet लावताय. Diversification शक्यच होत नाही.

जर ₹3,000 गुंतवणूक करायचे असतील — तर जास्तीत जास्त 2–3 कंपन्या.

म्युच्युअल फंडमध्ये गणित बदलत.

₹500 SIP ने तुम्ही एंट्री घेऊ शकता. आणि त्या ₹500 मध्ये तुमचे पैसे 40–100 कंपन्यांमध्ये पसरतात. मोठ्या, मध्यम, लहान — सगळे सेक्टर.

म्हणजे तुम्ही एका कंपनीची ग्रोथ पकडत नाही. तुम्ही economy ची ग्रोथ पकडता

इथे खरी गोष्ट रकमेची नाही — Access ची आहे.

स्टॉकमध्ये Diversification करण्यासाठी मोठ कॅपिटल लागत. म्यूचुअल फंडमध्ये Diversification आधीच built-in मिळतं.

म्हणून कमी पैशात सुरुवात करायची असेल तर म्यूचुअल फंड उत्तम पर्याय आहेत.

Mutual Funds Vs Stocks: मग कोणती गुंतवणूक योग्य?

तुम्हाला कंपन्या Analyse करायला आवडत असेल, लॉस Mentally सहन होतो आणि शेअर मार्केटला ट्रॅक करायची आवड आहे तर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करा.

तुम्ही बिझी salaried व्यक्ति असाल, तुमच ध्येय रिटायरमेंट किंवा future corpus असेल आणि Systematic गुंतवणूक हवी असेल तर म्युच्युअल फंड्स practically योग्य आहेत.

दोन्ही चुकीचे नाहीत पण mismatch महाग पडतो

Mutual Funds Vs Stocks: मी काय निवडल असत?

मी आधीच निवड करून झालोय.

जॉब आहे. मुंबई ट्रेनचा प्रवास आहे. वाचन करायचं असतं. कंटेंट बनवायचं असतं.

यामध्ये रोज Charts पाहणं, balance sheet वाचणं, stocks निवडणं… प्रामाणिकपणे सांगायचं तर — शक्य नाही.

म्हणून म्यूचुअल फंड माझ्यासाठी योग्य आहे.

तुम्ही काय निवडाल?

वाचा: पगार वाढला की SIP सुरू करतो — सर्वात महाग आर्थिक चूक? | SIP Investment Mistake in Marathi

Mutual Fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully before investing.

Author

Leave a Comment