फक्त 5 वर्षे उशीर… आणि गमावले ₹1.21 कोटी! SIP ची खरी ताकद जाणून घ्या

Mutual Fund SIP: कल्पना करा, दोन मित्र आहेत — अजय आणि विजय. दोघांनाही गुंतवणुकीचं महत्त्व माहिती होतं. दोघेही चांगली नोकरी करत होते आणि भविष्यासाठी पैसे साठवण्याचा विचार करत होते. पण त्यांच्या आयुष्यात एक छोटासा फरक होता. अजयने SIP ची सुरुवात वयाच्या 25 व्या वर्षी केली, तर विजयने “अजून वेळ आहे” असा विचार करत 5 वर्षे थांबून 30 व्या वर्षी SIP सुरू केली. आज दोघेही 60 वर्षांचे झाले आहेत. पण त्यांच्या संपत्तीतला फरक पाहिला, तर कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा फरक त्यांच्या कमाईमुळे नाही, तर वेळेमुळे निर्माण झाला आहे. म्हणूनच गुंतवणुकीत वेळ ही सर्वात मोठी ताकद मानली जाते.

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे Systematic Investment Plan. ही Mutual Fund मध्ये नियमित गुंतवणूक करण्याची एक सोपी पद्धत आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता. त्यामुळे एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज पडत नाही आणि हळूहळू मोठा फंड तयार होऊ लागतो. SIP चा सर्वात मोठा फायदा म्हणजे Compounding. म्हणजेच, तुमच्या पैशांवर मिळालेल्या परताव्यावर पुन्हा परतावा मिळत राहतो. कालांतराने ही वाढ खूप मोठी होऊ शकते.

गुगलवर आपल्या ब्लॉगला Preferred Source म्हणून Add करा!

अजयने काय केलं?

अजयने वयाच्या 25 व्या वर्षी SIP सुरू केली आणि निवृत्तीपर्यंत म्हणजे 60 वर्षांपर्यंत गुंतवणूक चालू ठेवली. त्याने एकूण ₹21 लाखांची गुंतवणूक केली. पण दीर्घकाळ Compounding चा फायदा मिळाल्यामुळे त्याला ₹2,54,54,156 इतकी Wealth Gain झाली. आणि त्याचा एकूण Corpus ₹2,75,54,156 पर्यंत पोहोचला. अजयने करोडो रुपये एकदम गुंतवले नव्हते. त्याने फक्त नियमितपणे SIP सुरू ठेवली आणि वेळेला त्याचं काम करू दिलं.

या SIP कॅलक्युलेशनमध्ये आपण 12% रिटर्न गृहीत धरला आहे. खर तर लॉन्ग टर्ममध्ये या पेक्षा जास्त रिटर्न मिळतात.

विजयने काय केलं?

विजयने SIP सुरू करण्यासाठी फक्त 5 वर्षे उशीर केला. त्याने वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली आणि 60 वर्षांपर्यंत चालू ठेवली. त्याची एकूण गुंतवणूक ₹18 लाख झाली. त्यावर त्याला ₹1,36,04,866 इतका Wealth Gain झाली आणि त्याचा Total Corpus ₹1,54,04,866 झाला. विजयनेही चांगली गुंतवणूक केली होती. पण त्याच्याकडे वेळ कमी होता आणि त्यामुळे Compounding ला काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला.

फक्त 5 वर्षांचा फरक… पण परिणाम करोडोंमध्ये

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजय आणि विजय यांच्या गुंतवणुकीत फार मोठा फरक नव्हता. अजयने ₹21 लाख गुंतवले, तर विजयने ₹18 लाख. म्हणजे दोघांच्या गुंतवणुकीत फक्त ₹3 लाखांचा फरक होता. पण अंतिम संपत्ती पाहिली, तर खरा फरक तिथे दिसतो.

mutual fund sip calculation in marathi

₹2,75,54,156 – ₹1,54,04,866 = ₹1,21,49,290

म्हणजेच, फक्त 5 वर्षे लवकर SIP सुरू केल्यामुळे अजयकडे विजयपेक्षा तब्बल ₹1.21 कोटी जास्त संपत्ती तयार झाली. हीच Compounding ची ताकद आहे.

वेळ तुमच्या पैशांसाठी काय करू शकतो?

गुंतवणुकीत Amount पेक्षा Time अधिक महत्त्वाचा असतो. कारण वेळ जितका जास्त, तितका Compounding चा परिणाम मोठा होतो. जेव्हा तुम्ही लवकर गुंतवणूक सुरू करता, तेव्हा तुमच्या पैशांना वाढण्यासाठी जास्त वेळ मिळतो. त्या वाढलेल्या पैशांवर पुन्हा परतावा मिळतो आणि ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू राहते. सुरुवातीला वाढ लहान वाटते, पण काही वर्षांनंतर ती exponentially वाढू लागते. म्हणूनच अनेक Financial Experts म्हणतात की, “Market ला time करण्यापेक्षा market मध्ये जास्त वेळ राहणं महत्त्वाचं आहे.”

गुगलवर आपल्या ब्लॉगला Preferred Source म्हणून Add करा!

SIP सुरू करण्यासाठी योग्य वेळ कोणती?

अनेक लोक विचार करतात की, “पगार वाढल्यानंतर SIP सुरू करेन” किंवा “मोठी रक्कम जमा झाल्यावर गुंतवणूक सुरू करेन.” पण खरं म्हणजे, SIP सुरू करण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे आत्ताच. कारण SIP मध्ये सुरुवातीची रक्कम छोटी असली तरी वेळेमुळे ती मोठ्या संपत्तीत बदलू शकते.

निष्कर्ष

अजय आणि विजय यांच्या उदाहरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की गुंतवणुकीत वेळेची किंमत करोडोंमध्ये असू शकते. फक्त 5 वर्षांचा उशीर पुढे जाऊन ₹1 कोटींपेक्षा जास्त फरक निर्माण करू शकतो. त्यामुळे SIP सुरू करताना मोठी रक्कम असण्याची वाट पाहण्यापेक्षा, लवकर सुरुवात करणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण वेळ आणि Compounding मिळून तुमच्या Wealth Creation चा संपूर्ण खेळ बदलू शकतात.

Author

  • sajan bhuvad founder of marathi finance

    साजन भुवड हे एक अनुभवी बँकर असून त्यांना बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रात 5 वर्षांहून अधिक प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यांनी सुमारे 4.5 वर्षे Saraswat Co-operative Bank मध्ये काम केले असून या काळात त्यांनी कर्ज, गुंतवणूक आणि ग्राहक वित्तीय सेवांबाबत सखोल अनुभव मिळवला आहे. सध्या ते ICICI Prudential Mutual Fund मध्ये Relationship Manager म्हणून कार्यरत आहेत, जिथे ते गुंतवणूकदारांना योग्य म्युच्युअल फंड निवड आणि आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन करतात.ते National Institute of Securities Markets (NISM) सर्टिफाइड असून, त्यांना गुंतवणूक आणि भांडवली बाजाराबाबत अधिकृत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्राप्त आहे.त्यांना वाचनाची विशेष आवड असून, आपल्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे ते मराठी वाचकांसाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि पर्सनल फायनान्स या विषयांवर सोप्या, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती देतात.त्यांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांना योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणे, त्यांची आर्थिक साक्षरता वाढवणे आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करणे.

Leave a Comment